कौटुंबिक न्यायालय येथे वादनिवारण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:18+5:302021-09-04T04:22:18+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज.एस.शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा ...
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज.एस.शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ.के.शेख, जिल्हा सरकारी वकील डी.यू.दराडे, वकील संघाचे उपाध्यक्ष के. आर. चोखट, कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांची उपस्थिती होती. दाखल पूर्व वैवाहिक वाद निवारण कक्षाच्या फलकाचे व निवारण कक्षाचे प्रमुख फायदे या दोन फलकांचे अनावरण यावेळी करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा म्हणाले, दाखल पूर्व वैवाहिक वाद निवारण कक्ष हे आजच्या काळात गरजेचे आहे. या मार्गाने संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविता येतील. यामुळे भांडण व वाद न्यायालयात येण्यापूर्वीच थांबविता येऊ शकतात, असे ते म्हणाले. यावेळी न्यायालयाचे प्रबंधक पुरुषोत्तम कुलकर्णी, लघुलेखक एम.एस.बेग, वामन वाघमारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राधा गवारे यांनी केले तर पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी नागरिक, महिला यांच्यासह विधिज्ञांची उपस्थिती होती.