हाय-वे मृत्युंजय दूत योजनेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:00+5:302021-03-04T04:31:00+5:30
हाय-वे रस्त्यावरील प्रत्येक गावात ग्रामीण सुरक्षा दलाच्या धर्तीवर हाय-वे मृत्युंजय दूत दलाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपघातग्रस्तांना या ...
हाय-वे रस्त्यावरील प्रत्येक गावात ग्रामीण सुरक्षा दलाच्या धर्तीवर हाय-वे मृत्युंजय दूत दलाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपघातग्रस्तांना या दलामार्फत तत्काळ उपचार मिळावेत, हा उद्देश आहे. तसेच परळी-गंगाखेड या रस्त्यावर निळा पाटी येथे १० बेडचे प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या दलाच्या उद्घाटनप्रसंगी दिली. याप्रसंगी महामार्ग पोलीस अधीक्षक संजय जाधव, पुणे विभागाचे महामार्ग पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, मुंबईच्या पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके, औरंगाबादचे महामार्ग पोलीस अधीक्षक नंदिनी चांदूपरकर, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, शेखर कावळे, राजाभाऊ कातकडे, बालाजी कचवे, रामेश्वर खत्री, दिलीप निकाळजे, शिवाजी देशमुख, राम लटके, नितीन खंदारे यांच्यासह वाहनचालकांची उपस्थिती होती.