परभणीत सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:29 AM2018-01-17T00:29:20+5:302018-01-17T00:29:30+5:30
महानगरपालिकेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या तीन सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन १६ जानेवारी रोजी महापौर मीनाताई वरपूडकर आणि आयुक्त राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या तीन सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन १६ जानेवारी रोजी महापौर मीनाताई वरपूडकर आणि आयुक्त राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले.
शहरातील सेवकनगर, मातोश्रीनगर आणि प्रभाग क्रमांक ४ मध्ये सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत परभणी शहरात स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत. या शौचालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महापौर मीनाताई वरपूडकर म्हणाल्या, स्वच्छता राखण्यासाठी ६० सार्वजनिक शौचालयांची उभारणी महापालिकेने केली आहे. विशेष म्हणजे शौचालयाच्या ठिकाणी महिला कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय दूर होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमास नगरसेवक अलीखान, पाशा कुरेशी, उपायुक्त डॉ.विद्या गायकवाड, स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद, प्रल्हाद देशमाने आदींची उपस्थिती होती.