शिलाई मशीन प्रशिक्षणाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:45+5:302021-01-02T04:14:45+5:30
वाळू मिळेना परभणी: जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूघाटांचे लिलाव झाले नसल्याने घरकुल बांधकामासाठी वाळू मिळत नाही. बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला ...
वाळू मिळेना
परभणी: जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूघाटांचे लिलाव झाले नसल्याने घरकुल बांधकामासाठी वाळू मिळत नाही. बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला भिडल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले आहे.
रस्ता बनला खड्डेमय
परभणी: शहरातील महात्मा फुले चौक ते नारायण चाळ हा रस्ता मागील अनेक महिन्यांपासून उखडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे या ठिकाणी रोज एक-दोन अपघात घडत आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
रस्त्यावर फळगाडे
सेलू: शहरातील मुख्य रस्त्यावर फळगाडे लागत असल्याने वाहनचालकांना वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याकडे नगरपालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
बगीचाची दुरवस्था
परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरातील बगीचाची बकाल अवस्था झाली आहे. या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावून परिसर सुशोभित करण्यासाठी जागा आखण्यात आली आहे. त्यास छोटेखानी संरक्षक भिंतही बांधली आहे. मात्र, अधिकाऱ्यांचे या बगीचाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सध्या या भागात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, परिसर अस्वच्छ झाला आहे.
वाहनांचा गराडा
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांचा गराडा पडत आहे. नो पार्किंगच्या जागेतच वाहने उभी केली जात असून नागरिकांना कार्यालयात प्रवेश करताना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.