तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:30 AM2020-12-03T04:30:37+5:302020-12-03T04:30:37+5:30
पालम तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात ५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली आहे. अतिवृष्टीने पिकांची प्रचंड नासाडी झाली ...
Next
पालम तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात ५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली आहे. अतिवृष्टीने पिकांची प्रचंड नासाडी झाली होती, तसेच पाणी जास्त झाल्याने पीक जागेवरच वाळून गेले होते. निसर्गाच्या संकटातून कसेबसे वाचलेले पीक आता अळीच्या कचाट्यात सापडले आहे. फुलांचा बहर असताना अळ्यांचे वाढलेले प्रमाण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. महागडी रासायनिक औषध फवारणी केली जात आहे. अळीचे संकट घोंगावत असताना २ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अनेक गावाच्या शिवारात धुई पडली होती. त्यामुळे या दोन्ही संकटामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.