अधिसूचित सर्वेक्षणात पेडगाव मंडळाचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:31+5:302021-09-04T04:22:31+5:30
यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, पेडगाव महसूल मंडळात जुलै व ऑगस्ट महिन्यात सलग २२ दिवस पाऊस नव्हता. केवळ एक ...
यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, पेडगाव महसूल मंडळात जुलै व ऑगस्ट महिन्यात सलग २२ दिवस पाऊस नव्हता. केवळ एक दिवस स्कायमॅक्स मशीन बसवलेल्या भागात १२ मि.मी. पाऊस पडल्याने पेडगाव महसूल मंडळ सोयाबीन अग्रिम पिकविमा देण्यासाठीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेतून पेडगावला वगळण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाने २२ पैकी २१ दिवसांचा सलग पावसाचा खंड गृहीत धरून पेडगाव महसूल मंडळाचा जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचित सर्वेक्षणात समावेश करावा व पेडगावला विमा अग्रिम देण्यासाठी समाविष्ट करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, माणिकराव कदम, अभिजित कदम, कांचन कदम, बाळासाहेब देशमुख, डी. के. देशमुख, मंगेश देशमुख, अब्दुल हाफिज, माधव देशमुख, श्याम मेटे, परमेश्वर कदम, श्रीकृष्ण कदम आदींची नावे आहेत.