देशाच्या राजपत्रात 'वना कृषी विद्यापीठाच्या' तीन पिक वाणांचा समावेश

By राजन मगरुळकर | Published: March 8, 2023 03:57 PM2023-03-08T15:57:46+5:302023-03-08T15:59:07+5:30

वाणातील तूर पिकांतील रेणुका वाणास महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्याकरिता लागवडीकरिता प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली

Inclusion of three crop varieties of Forestry Agriculture University in the country's gazette | देशाच्या राजपत्रात 'वना कृषी विद्यापीठाच्या' तीन पिक वाणांचा समावेश

देशाच्या राजपत्रात 'वना कृषी विद्यापीठाच्या' तीन पिक वाणांचा समावेश

googlenewsNext

राजन मंगरुळकर 

परभणी : केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार केंद्र सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारशीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात केला आहे. याबाबत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सोमवारी अधिसूचना प्रसिद्ध केली. सदर तीन वाणात विद्यापीठ विकसित तुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका), सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणांचा समावेश आहे.

सदरील वाणांचे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येते आणि या वाणांचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रासह बाहेरील राज्यात मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार असल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. वाणातील तूर पिकांतील रेणुका वाणास महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्याकरिता लागवडीकरिता प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली तर सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकांचे पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हे राज्याकरिता लागवडीस मान्यता प्राप्त झाली.

तीन वाणांची माहिती

तुरीचा बीडीएन-२०१३-२ (रेणुका) वाण : तुरीचा रेणुका हा वाण विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेला असून हा वाण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या मध्य भारत प्रभागासाठी प्रसारित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. वाण बीएसएमआर-७३६ मादी वाण वापरुन आयसीपी-११४८८ हा आफ्रिकन दाते वाण संकरीत करुन निवड पद्धतीने तयार केला आहे. हा वाण १६५ ते १७० दिवसात तयार होतो तसेच मर रोगास प्रतिकारक असून वांझ रोगास प्रतिबंधक आहे. वाणाचे १०० दाण्याचे वजन ११.७० ग्रॅम असून फुलांचा रंग पिवळा तर शेंगाचा रंग हिरवा आहे. सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी १८ ते २० क्विंटल आहे.

सोयाबीनचा एमएयुएस-७२५ वाण : अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित हा वाण राज्यासाठी प्रसारित केला आहे. हा वाण ९० ते ९५ दिवसात लवकर येणारा वाण असून अर्ध निश्चित वाढ चिरकी मोठी व गडद हिरवी पाने असलेला शेंगाची जास्त संख्या व २०-२५ टक्के चार दाण्यांच्या शेंगा असलेला वाण आहे. बियाणाचा आकार मध्यम, १०० दाण्यांचे वजन १० ते १३ ग्रॅम आहे. हा वाण कीड व रोगास मध्यम प्रतिकारक असून हेक्टरी उत्पादन क्षमता सरासरी २५ ते ३१.५० क्विंटल आहे.

करडई पिकांचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) वाण : अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित हा वाण राज्याकरिता प्रसारित केला आहे. वाण कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी उपयुक्त असून यात तेलाचे प्रमाण अधिक (३०.९० टक्के) आहे. हा वाण मर रोग आणि अल्टरनेरिया रोग आणि मावा किडीस सहनशील आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन क्षमता कोरडवाहू मध्ये १० ते १२ क्विंटल तर बागायतीमध्ये १५ ते १७ क्विंटल आहे.

Web Title: Inclusion of three crop varieties of Forestry Agriculture University in the country's gazette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.