पुलाची उंची वाढवा; फाल्गुनी नदीच्या पुरात बसून ग्रामस्थांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 03:08 PM2021-10-18T15:08:04+5:302021-10-18T15:08:26+5:30
सातत्याने पुलावर पाणी येत असल्याने ग्रामस्थांची जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
सोनपेठ ( परभणी ) : शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावरील फाल्गुनी नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात ग्रामस्थांनी आज आंदोलन केले .
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीवर कमी उंचीचा पुल आहे. यामुळे मुसळधार पावसात पुलावरून नेहमीच पाणी वाहते. पुलावरुन पाणी गेल्यास गोदाकाठच्या ११ गावांचा संपर्क तुटतो. या रस्त्यासाठी नागरिकांना अनेकदा आंदोलने केली. विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.
सातत्याने पुलावर पाणी येत असल्याने ग्रामस्थांची जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी ( दि.17 ) रात्री साठे आठच्या सुमारास एका ट्रँक्टरमध्ये जाणारी पाच मजूर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ट्रॉली उलटल्याने ट्रँक्टरहेडसह नदीत उलटले. पाच जण जाऊन झुडपांना अडकले. शेळगाव येथील ग्रामस्थांनी पाचही जणांंना दोरखंडांच्या सहाय्याने बाहेर काढले.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आज सकाळी अकरा वाजता शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदु यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे, अनिल रोडे, सोमनाथ नागुरे यांच्यासह गोदाकाठच्या ग्रामस्थांनी पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात बसून आंदोलन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह शेळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे, नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले.