इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुलावरून पाणी गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 02:56 PM2022-09-03T14:56:49+5:302022-09-03T14:57:07+5:30
उर्ध्वगतीचा पाण्याचा दाब आणि नदीचा गोदावरीत मिसळणारा प्रवाहाने पात्र तुंबले आहे.
गंगाखेड (परभणी): जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीचे पाणी इंद्रायणी नदीला मिळाल्याने सायळा-सुनेगाव पुलावरून पाणी वाहत आहेत. यामुळे आज सकाळी १० वाजेपासून ८ गावांचा संपर्क तुटला आहे.
इंद्रायणी नदीत गोदावरी नदीचे पाणी उर्ध्वगतीने जात आहे. उर्ध्वगतीचा पाण्याचा दाब आणि नदीचा गोदावरीत मिसळणारा प्रवाहाने पात्र तुंबले आहे. यामुळे सुनेगाव सायळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे धारखेड, मुळी, नागठाणा, आवलगाव, धसाडी, सायळा, सुनेगाव, माळसोन्ना या गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून जवळपास तीन फुटवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. दोन्ही बाजूला ग्रामस्थान थांबले असून पुर कमी होण्याची प्रतिक्षा करत आहेत.