धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पूर्णा नदीच्या पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:20 AM2021-09-23T04:20:42+5:302021-09-23T04:20:42+5:30
येलदरी व सिद्धेश्वर या दोन्ही धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने यातून मंगळवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ...
येलदरी व सिद्धेश्वर या दोन्ही धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने यातून मंगळवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी पूर्णा नदीपात्रात जमा झाल्याने नदीचे पात्र काठोकाठ वाहत आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीवरून बुधवारी सकाळपासून पूर्णा शहरालगत वाहणाऱ्या पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली असून ती साडेपाच मीटर उंचीने वाहत आहे. नदीवरील कोल्हापुरी बंधारा हा पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे तर नदी पत्रातील महादेव मंदिरही पाण्याखाली बुडाले आहे. दोन्ही धरणा सोबतच निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणीही पूर्णा नदीपत्रात विसर्गित होणार आहे. पूर्णेपासून काही अंतरावर पूर्णा नदी ही गोदावरी नदी पात्रात विसर्गित होत असल्याने सद्यस्थितीत कोणताही धोका नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.