रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढली धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:11+5:302021-01-19T04:20:11+5:30

शहरवासियांना आठ दिवसांआड पाणी परभणी : शहरात पाण्याची समस्या कायम आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा ...

Increased dust due to potholes on roads | रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढली धूळ

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढली धूळ

Next

शहरवासियांना आठ दिवसांआड पाणी

परभणी : शहरात पाण्याची समस्या कायम आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाचा अभाव असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षीच्या उन्हाळ्यात १३ ते १५ दिवसांतून एक वेळा शहराला पाणी मिळत होते. आता ते ८ दिवसांतून एक वेळा दिले जात आहे. मनपाने नियमित आणि चार दिवसांआड पाणीपुरवठा करावा, नागरिकांची मागणी आहे.

अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर

परभणी : शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. ८ ते १० महिन्यांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने शहरी भागातील रस्ते खराब झाले आहेत. नव्या वसाहतीत ही समस्या अधिक गंभीर आहे. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातही होत असून, मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

जलवाहिनीला गळती

परभणी : शहरातील काही भागांत जलवाहिनीला गळती लागली आहे. नळाला पाणी सोडल्यानंतर रस्त्यावर पाण्याचे लोट वाहतात. मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. तेव्हा मनपा प्रशासनाने जलवाहिनीची दुरुस्ती करून गळती थांबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

बाजारपेठ भागात पुन्हा हातगाडे

परभणी : येथील गांधी पार्क परिसरातील हातगाडे महिनाभरापूर्वी वाहतूक पोलिसांनी हटविले होते. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीसाठी होत असलेला अडथळा दूर झाला होता. मात्र आता पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. गांधी पार्क भागात मोठ्या प्रमाणात फळ आणि भाजी विक्रेते थांबत आहेत. त्यामुळे येथील वाहतूक वारंवार जाम होत आहे.

रोहयोची कामे जिल्ह्यात ठप्प

परभणी : जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची कामे ठप्प पडली आहेत. प्रशासकीय यंत्रणेने ही कामे वाढविणे आवश्यक असताना त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कोरोनाच्या काळात मोठ्या शहरातून अनेक मजूर परभणीत परतले आहेत. या मजुरांना त्यांच्या गावी काम उपलब्ध होत नाही. त्यामुळे शहरी भागात त्यांचे स्थलांतर होत आहे. प्रत्येकाच्या हाताला काम देण्याची जबाबदारी प्रशासनाची असून, रोहयोची कामे वाढवावीत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Increased dust due to potholes on roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.