टोमॅटो पिकावर वाढला करपा रोगाचा प्रादुभार्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:05+5:302020-12-07T04:12:05+5:30
दोन आठवड्यांपासून वातावरणात आमूलाग्र बदल झाला आहे. कधी तापमानात मोठी वाढ होत आहे तर कधी तापमान घसरत आहे. परिणामी ...
दोन आठवड्यांपासून वातावरणात आमूलाग्र बदल झाला आहे. कधी तापमानात मोठी वाढ होत आहे तर कधी तापमान घसरत आहे. परिणामी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी ॲझोक्सिट्रोबीन १२.८ टक्के अधिक डायफेन कोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, पुनर लागवड केलेल्या भाजीपाला पिकात तण नियंत्रण करून पाण्याचे व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंशाच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत. तसेच २५ ते २८ सेंटीग्रेड तापमान ठेवण्यासाठी संगोपनगृहात धूररहित कोळसा शेगडी किंवा इलेक्ट्रिक रूम हीटरचा वापर करावा, तसेच तापमान मर्यादित ठेवण्याबरोबरच आर्द्रता ८० ते ८५ टक्के ठेवण्यासाठी ह्युमिडी फायरचा वापर करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे.