दंडाच्या भीतीने मास्क विक्रीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:06+5:302021-03-17T04:18:06+5:30

राज्य रस्त्याचे काम ठप्प; गैरसोय वाढली पालम : शहरापासून परभणीला जोडणाऱ्या पालम ते ताडकळस या राज्य रस्त्याचे काम गेल्या ...

Increased mask sales for fear of penalties | दंडाच्या भीतीने मास्क विक्रीत वाढ

दंडाच्या भीतीने मास्क विक्रीत वाढ

Next

राज्य रस्त्याचे काम ठप्प; गैरसोय वाढली

पालम : शहरापासून परभणीला जोडणाऱ्या पालम ते ताडकळस या राज्य रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून ठप्प झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पालम ते ताडकळस या २० किमी राज्य रस्त्याच्या कामाचे दुसऱ्या टप्प्यातील मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या कामाला गती येईल, अशी पालमवासीयांची अपेक्षा होती. परंतु, काम ठप्प आहे.

मानवतमधील एटीएम केंद्रांची सुरक्षा रामभरोसे

मानवत : शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या एटीएमची सुरक्षा रामभरोसे सुरू आहे. शहरातील एकाही एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने चोरटे हातचालाखीने नागरिकांची फसवणूक करीत आहेत. मानवत शहरात भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम केंद्र आहेत. तसेच बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय, कॅनरा, धनलक्ष्मी को-ऑप बँक आदींचेही एटीएम केंद्र आहे. एटीएमची सुविधा उपलब्ध असल्याने पैसे काढण्यासाठी ग्राहक बँकेच्या रांगेत थांबण्याऐवजी या केंद्रांना पसंती देत आहेत. त्यामुळे या केंद्रावर सतत वर्दळ दिसून येते.

वाहनतळाअभावी वाहतूक विस्कळीत

परभणी : येथील बसस्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा नसल्याने बसस्थानकाच्या परिसरात अस्ताव्यस्त वाहने लावली जात आहेत. त्यामुळे स्थानकातून बस बाहेर काढताना आणि स्थानकात बस आणताना चालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात दुभाजक बसविण्याची मागणी

परभणी : शहरातील गव्हाणे चौक ते नवा मोंढा भागात जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वर्षांपूर्वी तकलादू दुभाजक बसविण्यात आले होते. त्यामधून वाहनधारक सर्रासपणे ये-जा करतात. त्यामुळे या भागात उंच दुभाजक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

शहरातील पथदिवे बंद असल्याने गैरसोय

परभणी : शहरातील संभाजीनगर, दादाराव प्लॉट आदी भागांतील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद झाले आहेत. हे पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली. परंतु, त्याकडे महानगरपालिकेने लक्ष दिलेले नाही.

फरशा उखडल्या; खिडक्याही तुटल्या

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या बाल रुग्ण विभाग आणि प्रशासकीय इमारतीची दोन वर्षांतच दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या फरशा उखडल्या आहेत, तर काही ठिकाणी खिडक्याही तुटल्या आहेत.

विजेअभावी शेतकऱ्यांना फटका

परभणी : वीज वितरण कंपनीच्या वतीने थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या वीज बिल वसुली मोहिमेचा मोठा फटका बसला आहे. परिणामी सिंचन खुंटले आहे.

‘रस्त्याच्या कामावर पाणी मारा’

परभणी : जिंतूर-परभणी या महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी मारण्यात येत नाही. परिणामी वाहनधारकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे.

सिंचन विहिरींची कामे संथगतीने

परभणी : ग्रामीण भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गत सार्वजनिक विहीर खोदण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे.

तालुक्यांना मिळेनात क्रीडांगणे

परभणी : जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये खेळाडूंसाठी तालुका क्रीडांगण उपलब्ध नाही. त्यामुळे शालेय, तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा खासगी जागेत घ्याव्या लागत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Increased mask sales for fear of penalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.