मॉर्निंग वॉकसाठी वाढली संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:38+5:302020-12-07T04:11:38+5:30
वाळूअभावी घरकुलाची कामे ठप्प परभणी : पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी परवानगी देण्यात ...
वाळूअभावी घरकुलाची कामे ठप्प
परभणी : पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरांचे काम ठप्प पडले आहे. घरकुलांसाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. मात्र, यासंदर्भात प्रशासनाने अद्यापपर्यंत गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे केवळ वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांना बांधकामे बंद ठेवावी लागत आहेत.
विकासकामांसाठी निधीचा अडसर
परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत झाले असले तरी अद्याप विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून ही कामे ठप्प आहेत. रस्ते, शासकीय इमारतींचे बांधकाम, पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती ही कामे ठप्प पडली आहेत. या कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.
मजुरांच्या हाताला मिळेना काम
परभणी : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे पूर्ण क्षमतेने सुरू केली नाहीत. त्यामुळे नोंदणी केलेल्या मजुरांची संख्या एक लाखांपेक्षा अधिक असली तरी तेवढ्या मजुरांना काम उपलब्ध होत नाही. शासकीय काम मिळत नसल्याने मजुरांना खाजगी कामांच्या शोधासाठी शहराचा रस्ता धरावा लागत आहे.
नळजोडण्या वाढेनात
परभणी : शहरात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असली तरी नवीन नळजोडण्या घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेत नसल्याने मनपा प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. वारंवार आवाहन करुनही नागरिक नळजोडण्या घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याची स्थिती आहे. नवीन जलवािहनीवर मुबकल प्रमाणात नळजोडण्या नसल्याने पाणीपुरवठा करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.
फुटपाथचे काम संथगतीने
परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने फुटपाथ टाकण्याचे काम संथगतीने सुरू आहे. सध्या वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात हे काम सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी फुटपाथ टाकण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ते बंद पडले. चार दिवसांपासून हे काम सुरू केलेले आहे. मात्र, कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.