हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:50+5:302020-12-30T04:22:50+5:30

पाथरी तालुक्यात रब्बीचे क्षेत्र २४ हजार हेक्टर असून, या भागात रब्बीमध्ये दरवर्षी शेतकरी ज्वारीची पेरणी अधिक करतात. ज्वारीचे सर्वसाधारण ...

Infestation of larvae on gram crop | हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

Next

पाथरी तालुक्यात रब्बीचे क्षेत्र २४ हजार हेक्टर असून, या भागात रब्बीमध्ये दरवर्षी शेतकरी ज्वारीची पेरणी अधिक करतात. ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ४२० हेक्टर एवढे असताना यावर्षी ज्वारी पेऱ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. डिसेंबरअखेर ज्वारीचा पेरा ७ हजार ८३७ हेक्टर राहिला आहे. यावर्षी तालुक्यात परतीचा मोठा पाऊस झाला खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. मात्र पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. तसेच गोदावरी नदीचे बंधारे तुडुंब भरले. जायकवाडी धरणाचे पाणी रब्बीसाठी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी अधिक केली आहे. तालुक्यात रब्बीचा हरभरा सर्वसाधारण पेरा २ हजार ८२५ हेक्टरवर असताना ५ हजार ९४ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी १८० टक्के एवढी आहे. हरभरा पीक जोमदार आले असताना सध्या हरभरा पिकावर घाटेअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

Web Title: Infestation of larvae on gram crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.