महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:07+5:302021-09-08T04:23:07+5:30

परभणी : मागील काही महिन्यांपासून बाजारपेठेत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. प्रत्येक वस्तूंत एका किलोमागे दोन ते तीन ...

Inflation poured oil; The household budget went bad | महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले

महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले

Next

परभणी : मागील काही महिन्यांपासून बाजारपेठेत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. प्रत्येक वस्तूंत एका किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्याकाठी सहाशे ते सातशे रुपयांचा घरखर्च वाढला असून, सर्वसामान्य नागरिकांचे घरातील बजेट अक्षरश: कोलमडले आहे. त्यामुळे महागाईच्या झळांनी नागरिक होरपळत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरावंवर सर्वसामान्यपणे बाजारपेठेतील इतर वस्तूंचे दर अवलंबून असतात. देशभरातच पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक महिन्यात वाढत आहेत. जानेवारी महिन्यात ९२ रुपये प्रति लीटर असलेले पेट्रोल सप्टेंबर महिन्यात ११० रुपयांवर पोहोचले आहेत, तर ८९ रुपयांवर असलेले डिझेलचे दर आता ९८ रुपयांवर पोहोचले आहेत. या दरवाढीचा परिणामी बाजारपेठेच्या दरवाढीवर झाला आहे. किराणासह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने प्रत्येक महिन्यातील खर्चही वाढला. जानेवारी महिन्यातील घरगुती खर्चात किमान सहाशे ते सातशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरातील बजेट कोलमडले आहे.

डाळीचे वरण देऊ लागले चटके

दररोजच्या आहारात डाळींचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. डाळीचे वरणाचा हमखास जेवणात समावेश असतो. मात्र, मागच्या काही दिवसांपासून डाळींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे जेवणात डाळीचे वरण करताना नागरिकांना आखडता हात घ्यावा लागत आहे. डाळ महागल्याने वरणही चटके देऊ लागले आहे.

सिलिंडर हजाराच्या घरात

इंधनाच्या दरवाढीबरोबरच आता सिलिंडरचे दरही तेवढेच वाढत आहेत. दोन महिन्यांतून एक वेळा सिलिंडरचे दर ३० ते ३५ रुपयांनी वाढतात. त्याचा फटकाही गृहिणींना सहन करावा लागत आहे. मागील ९ महिन्यांत घरगुती सिलिंडरचे दर १६५ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ८५९ रुपयांना ग्राहकांना गॅस सिलिंडर खरेदी करावे लागत आहे. जानेवारी महिन्यात हेच दर ६९४ रुपयांचे होते.

मागील काही दिवसांपासून महागाई वाढली आहे. खाद्यपदार्थांसह सर्वच वस्तूंची दरवाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी किराणा आणि घरखर्चासाठी ठेवलेल्या रक्कमेत भागत नाही. त्यासाठी ८०० ते ९०० रुपये अधिकचे खर्च करावे लागत आहे. शासनाने महागाई कमी करुन दिलासा द्यावा.

रूपाली भरणे

बाजारपेठेत कोणतीही वस्तू खरेदी करा प्रत्येक महिन्यात त्या वस्तूचे दर वाढत आहेत. त्यामुळे एखाद्या वस्तूवर अपेक्षित केलेल्या खर्चाच्या तुलनेत अधिक खर्च करावा लागत आहे. घरातील किराणाचे बजेटही त्यातूनच वाढले आहे. त्यामुळे आर्थिक बाबी जुळविताना अडचणी येत आहेत. महागाई कमी करणे आवश्यक आहे.

शिवकन्या पारटकर

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च

अशी वाढली महागाई

तेल : ७५

धान्य : ६०

शेंगदाणे : ०९

साखर : १०

साबुदाणा : ०२

चहापुडा : ०४

डाळ : ४०

गॅस : २७५

पेटमोल : ३२०

एकूण : ५९५

Web Title: Inflation poured oil; The household budget went bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.