कोरोना लसीकरणासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:15+5:302021-06-11T04:13:15+5:30
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यात लसीचा तुटवडा असून ...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यात लसीचा तुटवडा असून ज्या ज्या वेळी लसीकरण होत आहे, त्या त्या वेळी पुरुषांच्या बरोबरीने महिलाही लसीकरणात सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील साधारणता १२ लाख नागरिकांना लसीकरण करावयाचे आहे. त्या तुलनेत आतापर्यंत २ लाख ८७ हजार १५३ नागरिकांनी लस घेतली आहे. संथगतीने लसीकरण होत असले तरी झालेल्या लसीकरणात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या राष्ट्रीय कार्यामध्ये महिला मागे नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या संसर्ग काळात अनेक महिलाही कोरोनाबाधित झाल्या होत्या. लसीकरणासाठी सुरुवातीला नागरिक पुढे येत नव्हते; परंतु महिलांनीच पुढाकार घेतल्याने पुरुषांचेही लसीकरण वाढले आहे. एका महिलेने लसीकरण करून घेतल्यास संपूर्ण कुटुंब लसीकरण करून घेते. त्यामुळे महिलांचे लसीकरण महत्त्वपूर्ण आहे. त्यास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळून येत आहे. विशेष म्हणजे, फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलांनीही लसीकरणासाठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. मी स्वतः दोन्ही डोस घेतले असून, माझ्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांचे लसीकरण करून घेतले आहे.
रूपाली भरणे
लसीकरणाचे सत्र सुरू होण्यापूर्वी पासूनच लसीची प्रतीक्षा करीत होते. लस उपलब्ध होताच महानगरपालिकेच्या केंद्रावर जाऊन दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे लसीकरण झाले.
निशा लाटकर
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने कोरोनाचा धोका कमी होतो. त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे लसीकरण करून घेतले. विशेष म्हणजे, आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.