दलितवस्तीच्या कामाची होईना चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:22+5:302020-12-05T04:27:22+5:30
परभणी : तालुक्यातील धर्मापुरी येथील दलितवस्ती योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची चौकशी करावी, यासाठी ग्रामस्थांनी दोन वेळेस जि.प. व पंचायत ...
परभणी : तालुक्यातील धर्मापुरी येथील दलितवस्ती योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची चौकशी करावी, यासाठी ग्रामस्थांनी दोन वेळेस जि.प. व पंचायत समिती कार्यालयाकडे निवेदने सादर केले. मात्र, चौकशी करण्याकडे दोन्ही कार्यालयांनी दुर्लक्ष केले आहे.
धर्मापुरी येथे समाजकल्याण व १४ व्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील मोठ्या नाल्याचे बांधकाम रखडले आहे, तसेच सिमेंट काँक्रीटमध्ये बांधकाम करण्याऐवजी पाईप नाल्यामध्ये टाकल्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी यासाठी १५ सप्टेंबर व ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदने सादर केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवेदनावर नवनाथ पैठणे, यशवंत पैठणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.