केअर सेंटरमध्ये कुलरअभावी रुग्णांची घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:55+5:302021-04-27T04:17:55+5:30
शहरात दररोज रुग्णसंख्या तीनशे ते चारशेने वाढत आहे. यातील सौम्य लक्षणे असणारे रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले जातात. ...
शहरात दररोज रुग्णसंख्या तीनशे ते चारशेने वाढत आहे. यातील सौम्य लक्षणे असणारे रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले जातात. महापालिकेने शहरात अक्षदा मंगल कार्यालय आणि पाथरी रस्त्यावर रेणुका मंगल कार्यालय येथे केअर सेंटर उभारले आहे. वाढते तापमान लक्षात घेता या केअर सेंटरमध्ये लाईट गेल्यास जनरेटर आणि कुलर्सची सोय असणे गरजेचे आहे. मात्र, दोन्ही केअर सेंटरमध्ये उन्हाच्या झळा सहन करत केवळ फॅनचे वारे घेऊन दिवस घालविण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
एकूण कोविड केअर सेंटर - २
दाखल पाॅझिटिव्ह - २६७
अक्षदा केअर सेंटर - १५४
रेणुका केअर सेंटर - ११३
तापमानाने ओलांडली चाळिशी
शहर व जिल्ह्याचे तापमान मार्चपासून वाढते. यंदा मार्च महिन्यात ३५ ते ३८ अंश इतके तापमान होते, तर सध्या एक एप्रिलपासून ४० अंशाच्या पुढे हे तापमान गेले आहे.
जनरेटर उपलब्ध
या दोन्ही केअर सेंटरमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सोय उपलब्ध आहे. शक्यतो येथील वीज पुरवठा खंडित होत नसल्याचे दाखल रुग्णांनी बोलून दाखविले.
उकाड्याचा त्रास सहन होईना
रेणुका केअर सेंटर गावाबाहेर आहे. येथे उन्हाच्या झळा अधिक बसत आहेत. फॅनचे वारे गरम येत आहे. त्यामुळे कुलर आवश्यक आहे. - बाधित रुग्ण.
कुलरची सोय करावी
येथे रुग्णसंख्या जवळपास दीडशे आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे गरम वारे सहन करत उपचाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कुलरची व्यवस्था करावी. - बाधित रुग्ण.