ग्रामीण भागात विजबील वाटपात अनियमितपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:16+5:302020-12-22T04:17:16+5:30
अरूंद पूल बनला अपघाताचे केंद्र देवगाव फाटा- जिंतूर रस्त्यावरील देवगाव फाटा येथे करपरा नदीवरील निजामकालीन पूल हा अरूंद ...
अरूंद पूल बनला अपघाताचे केंद्र
देवगाव फाटा- जिंतूर रस्त्यावरील देवगाव फाटा येथे करपरा नदीवरील निजामकालीन पूल हा अरूंद असून या पुलाच्या भिंतीला तडे गेल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. वळण रस्ता असल्याने या पुलाचा चालकांना नेमका अंदाज येत नाही. एकंदरीत हा पूल अपघाताचे केंद्र बिंदू बनला आहे.
इच्छुक उमेदवारांचा हिरमोड.
देवगाव फाटा- तहसील प्रशासनाने ग्रा.पं.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करताच आरक्षित जागेवर काही मंडळीने सरपंच पदासाठी कंबर कसली होती. एव्हढे नव्हे तर गावातील काही मंडळी आरक्षित प्रवर्गातील इच्छुक नागरिकांना सरपंच म्हणून संबोधणे सुरू केले होते. परंतु शासनाने सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्दबातल ठरविली आणि इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांची गैरसोय.
देवगाव फाटा - सेलू तालुक्यात विशेषकरून ग्रामीण भागात भारनियमन वेळेव्यतिरिक्त बहुतांश वेळी वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिकांची गैरसोय वाढत आहे.