२८ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:41+5:302020-12-08T04:14:41+5:30

परभणी : निम्न दुधना या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यांतील डाव्या आणि ...

Irrigation benefit for 28 thousand hectare area | २८ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

२८ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

googlenewsNext

परभणी : निम्न दुधना या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यांतील डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील २८ हजार ६९८ हेक्टरवरील शेती सिंचनासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे रबी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी पिकाच्या उत्पादन वाढीस लाभ होणार आहे.

शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने या प्रकल्पास आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध झाला. या निधीतून निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने निम्न दुधना प्रकल्प तुडुंब भरला. त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला असला तरी रबी हंगामातील पिकांमधून उत्पादन घेण्याचा कल शेतकऱ्यांत दिसून येत आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या सिंचनाकरिता २ डिसेंबर रोजी डाव्या आणि उजव्या कालव्यातून २१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यातच डाव्या व उजव्या कालव्यातून पाण्याच्या प्रवाहास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी माजलगाव कालवा क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी वेळीच दक्षात घेऊन कालव्यात काही ठिकाणी साचलेला गाळ व वाढलेली झाडे, झुडपी बाजूला केली. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेने होत आहे. कालव्याची स्वच्छता करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह चांगला राहून कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कार्यकारी अभियंता लांब हे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यावर्षी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील २८ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील शेती सिंचनास या पाण्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

‘‘यावर्षी लोअर दुधना धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. सिंचनासाठी पाणी सोडल्याने हे पाणी दोन्ही कालव्याच्या टेलपर्यंत पोहोचणार आहे. गाळ, झुडपे आम्ही अगोदरच काढून पाण्याचा प्रवाह आडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय होऊ न देता पाण्याचा जपून वापर करून शेती सिंचनासाठी उपयोग घ्यावा.

-प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

१५ डिसेंबरपर्यंत राहणार पाणी

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून २ डिसेंबरपासून २१ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गहू पिकास लाभदायी ठरणार आहे. विशेष म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत या पाण्याचा विसर्ग राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Irrigation benefit for 28 thousand hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.