थकीत रकमेसाठी जागर गोंधळ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:30 AM2021-02-18T04:30:27+5:302021-02-18T04:30:27+5:30
गंगाखेड शुगर साखर कारखान्याचे २०१८ व २०१९ चे गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्यांचे पैसे कारखाना प्रशासनाने आजपर्यंत ...
गंगाखेड शुगर साखर कारखान्याचे २०१८ व २०१९ चे गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्यांचे पैसे कारखाना प्रशासनाने आजपर्यंत दिले नाहीत. ऊस तोडणी व वाहतुकीचे १३ कोटी ५१ लाख रुपये कारखाना प्रशासनाकडे बाकी आहे. ही थकीत रक्कम कारखाना प्रशासनाने त्वरित द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, भास्कर खटिंग, माऊली शिंदे, सीताराम गिराम, नागेश शिंदे, रावसाहेब मुळे, महादेव हारकळ, बाबासाहेब चव्हाण, पंढरीनाथ महात्मे, महादेव थावरे, बाबासाहेब सातपुते, सीताराम पवार, प्रल्हाद राठोड, उत्तम चव्हाण, केशव दहे, भगवान चंदेल, शरद चव्हाण, तुकाराम तिडके, संजय घाडगे, ज्ञानोबा पाळवदे, प्रल्हाद आंधळे, आदींसह बहुसंख्य ऊस तोडणी व वाहतूकदारांनी तहसील कार्यालयासमोर जागर गोंधळ आंदोलन करीत दुपारी ३:३० वाजता तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी ऊस तोडणी व वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.