जीप-दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 07:00 PM2019-04-22T19:00:48+5:302019-04-22T19:01:35+5:30

गंभीर दुखापत झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू

Jeep-bike accident, father dies and son seriously injured | जीप-दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

जीप-दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

Next

परभणी : पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गावर आईन वाडी फाट्यानजीक जीप-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. गोपाळ पुंडलिक शिंदे (५० ) असे मृताचे नाव असून त्यांचा मुलगा भागवत (१८ )हा गंभीर जखमी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोहा येथून काम आटोपून गोपाळ पुंडलिक शिंदे मुलगा भागवत सोबत पालम कडे दुचाकीवर ( एमएच २२ ए एस १३२९) जात होते. याच दरम्यान, पालमहून लोहाकडे येणाऱ्या जीपसोबत ( एमएच22 ए एम २१६१) धडक झाली. यात दुचाकीवरील बापलेक रस्त्याच्या कडेला फेकली गेली. गोपाळ शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा भागवत गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदेड उपचार सुरु आहेत. 
 

Web Title: Jeep-bike accident, father dies and son seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.