जिंतूर - सेलूतील १५ गावांच्या रस्त्यांसाठी ३३ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:09+5:302021-09-04T04:22:09+5:30
राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी नुकतीच मुंबई येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. या अनुषंगाने माहिती ...
राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी नुकतीच मुंबई येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. या अनुषंगाने माहिती देताना ते म्हणाले की, जिंतूर व सेलू तालुक्यातील अनेक गावांची गेल्या ३० वर्षांपासून ग्रामीण भागातील रस्ते व पुलांची मागणी होती. या अनुषंगाने भाजपा सरकारच्या काळात विधानसभेत प्रश्न मांडून मंजुरी त्यास घेतली होती ; परंतु यासाठी निधी दिला नव्हता. ही बाब ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस माजी आ. विजय भांबळे, जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी, समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, जि.प. सदस्य अशोक काकडे यांच्यासह मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे प्रधान सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सेलू ते रा.मा.-२४८ ते शेक १ कोटी ३५ लाख, इ.जि.मा.-०६ ते सोरजा १ कोटी १ लाख, प्र.रा.मा.-०२ ते चामणी- तेलवाडी ता. जिंतूर १ कोटी ३० लाख, इ.जि.मा.-०३७ ते जांब ता. जिंतूर ७६ लाख, रा.मा.-२५३ ते काजळी रोहिणा ता. सेलू ३ कोटी २४ लाख, इ.जि.मा.-३७ ते कुडा ता. सेलू १ कोटी ५८ लाख, रा.मा.-२५३ ते पिंप्राळा ता. सेलू लाख, रा.मा.-२५३ ते वाकी ता. सेलू ५३ लाख , रा.मा.-२४८ ते येशेगाव-कडसावंगी ता. जिंतूर ४ कोटी ९४ लाख, प्र.रा.मा.-०२ ते बेलोरा- बेलोरा तांडा ता. जिंतूर ८१ लाख रुपये अशा एकूण सेलू व जिंतूर तालुक्यातील १५ गावांमधील रस्ते व पुलांसाठी ३३ कोटी ३० लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात असल्याचे भांबळे म्हणाले.