जिंतूर-सेलूत भांबळे, बोर्डीकरांचे दावे-प्रतिदावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:22+5:302021-01-19T04:20:22+5:30
दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनेही जिंतूर तालुक्यातील ६० ग्रामंपचायतींवर वर्चस्व मिळविले असल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले आहे. तालुक्यातील अंबरवाडी, वर्णा, पांगरी, ...
दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनेही जिंतूर तालुक्यातील ६० ग्रामंपचायतींवर वर्चस्व मिळविले असल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले आहे. तालुक्यातील अंबरवाडी, वर्णा, पांगरी, रेपा, कावी, दहेगाव, पुंगळा, सावंगी भांबळे, कोरवाडी, बलसा, कुऱ्हाडी, शेवडी, मालेगाव, घागरा, खोलगाडगा, साखरतळा, सुकळी वाडी, किन्ही, बेलोरा आदी ग्रामपंंचायतींचा त्यात समावेश असल्याचे म्हटले आहे. या शिवाय सेलू तालुक्यातील ६७ पैकी ४१ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या असल्याचे पक्षाचे तालुकाध्यक्ष माउली ताठे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आ. दुर्राणी, कदम यांचेही दावे
पाथरी तालुक्यातील ४२ पैकी ३५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले असल्याचे आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनहिताचे कार्य पाहून जनतेने विश्वास दाखविला आहे. जनतेच्या या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनीही पूर्णा तालुक्यात शिवसेनेने ६४ पैकी २६ जागांवर विजय मिळविला असल्याचा दावा केला आहे.