परभणी जिल्ह्यात पारवा येथे आगीत कडबा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:30 AM2018-05-09T00:30:35+5:302018-05-09T00:30:35+5:30
तालुक्यातील पारवा येथे गावाशेजारीच ठेवलेल्या पराट्या आणि कडब्याला ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पराट्या जळून खाक झाल्या. परभणी आणि मानवत येथील अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील पारवा येथे गावाशेजारीच ठेवलेल्या पराट्या आणि कडब्याला ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पराट्या जळून खाक झाल्या. परभणी आणि मानवत येथील अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.
पारवा गावा शेजारीच मोकळी जागा असून, या ठिकाणी शेतकऱ्यांनी पराट्या ठेवल्या होत्या. तसेच वाळलेली बाभळीची झाडेही या परिसरात होती. मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास या पराट्यांना अचानक आग लागली. हवेमुळे ही आग वाढतच गेली. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
परभणी येथून अग्नीशमन दलाचा बंबही बोलावला. मात्र ही गाडी बंद पडली. आग वाढतच जात होती. ही माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांना मिळताच त्यांनी गावात जाऊन भेट दिली. तसेच मानवत आणि परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्नीशमन दलाची गाडी बोलावली.
गावाजवळच आग लागल्याने या परिसरात गोठ्यात बांधलेली जनावरे इतरत्र हलवावी लागली. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली.