कोरोनाचा सामना करण्यासाठी कौसडी ग्रा.पं. सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:51+5:302021-04-27T04:17:51+5:30
जिंतूर तालुक्यातील कौसडी हे सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते. सद्यस्थितीत येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ...
जिंतूर तालुक्यातील कौसडी हे सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते. सद्यस्थितीत येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने २६ एप्रिल रोजी गावातील मुख्य चौकासह रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षावरील ग्रामस्थांना लस देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचबरोबर जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कौसडी ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या वाॅटर एटीएमची दुरुस्ती करून सोमवारपासून ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वच्छतेविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे प्रशासक डी. एस. खराबे, ग्राम विकास अधिकारी डी. एस. खराबे, सेवक बाळासाहेब मोरे, गणेश ईखे, विष्णू वडवले आदींनी दिली.