कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:04 PM2020-09-25T17:04:40+5:302020-09-25T17:05:34+5:30

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेच्या वतीने दि. २५ सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली.

Kisan Sabha agitation against Agriculture Bill | कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेचे आंदोलन

कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेचे आंदोलन

Next

मानवत : केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेच्या वतीने दि. २५ सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली आणि हे विधेयक मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार डी. डी. फुफाटे यांना देण्यात आले.

दु. १२: ३० वा. किसान सभेच्या कार्यालयापासून संत सावता माळी चौकापर्यंत पायी फेरी काढण्यात आली. संत सावतामाळी चौकात आल्यानंतर कृषी विधेयक मागे घ्यावे, अशा घोषणा देऊन विधेयकाच्या प्रती जाळण्यात आल्या. या आंदोलनात लिंबाजी कचरे पाटील, गजानन मसलकार, अशोक बुरखुंडे, अशोक बारहाते, गोविंद आमटे, आनंद भक्ते, संजय देशमुख, राणूबा कांबळे, प्रकाश पेडगावकर आदी सहभागी झाले होते.

 

 

 

Web Title: Kisan Sabha agitation against Agriculture Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.