परभणीत गुडघे, खुबेरोपण तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:50+5:302021-01-17T04:15:50+5:30
सांधेदुखी, गुडघादुखी होण्याची बरीच कारणे आहेत. अनेकदा गुडघा, पाय यांच्या शिरा खराब झालेल्या असतात, हाडांच्या दोन टोकांना जोडणारा भाग ...
सांधेदुखी, गुडघादुखी होण्याची बरीच कारणे आहेत. अनेकदा गुडघा, पाय यांच्या शिरा खराब झालेल्या असतात, हाडांच्या दोन टोकांना जोडणारा भाग खराब झालेला असतो, फ्रॅक्चरमुळे हाडांना इजा झालेली असल्यास रुग्णाला सांधेरोपण शस्त्रक्रिया सुचवली जाते. यामध्ये खराब झालेले सांधे / अवयव बदलून त्या जागी धातू, प्लास्टिक आणि सिरॅमिकचे अवयव प्रॉस्थेसीस बसविले जातात. प्रॉस्थेसीस शरीराची हालचाल सुलभपणे होण्यासाठी वापरले जातात. घोटा, मनगट, खांदा आदी भागांसाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ३० व ३१ जानेवारी रोजी या शिबिराचे आयोजन केले आहे. यात सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. सुनील सोनार, गुडघा व कोपर सांधे रोपणतज्ज्ञ डॉ. अभितेज म्हस्के यांच्या मार्फत तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे. सोबतच पनवेल लाईफ लाईन हॉस्पिटल येथील मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. अजिंक्य पाटील हे गरजू रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. तसेच रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रोग निदान तपासणी व उपचाराची सोय आहे. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रफुल्ल पाटील, संचालिका डॉ. विद्या प्रफुल्ल पाटील यांनी केले आहे.