मृत कोबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:33 AM2021-02-21T04:33:23+5:302021-02-21T04:33:23+5:30
तिडी पिंपळगाव येथे अश्रोबा भागवत यांचा गावाबाहेर शेत आखाड्यावरील पाळलेल्या ८० कोंबड्या पैकी गुरुवारी दुपारी अचानक २५ कोंबड्यांचा मृत्यू ...
तिडी पिंपळगाव येथे अश्रोबा भागवत यांचा गावाबाहेर शेत आखाड्यावरील पाळलेल्या ८० कोंबड्या पैकी गुरुवारी
दुपारी अचानक २५ कोंबड्यांचा मृत्यू झाला.याबाबतचे वृत ‘लोकमत’ने अंका शनिवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तालुका पशुसंवर्धन अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी व पशुसंर्वधन पर्यवेक्षक एस.जी.गाडीलोहार यांनी या मृत कोंबड्यापैकी ५ नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.या दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए.बी.लोने यांनी घटनास्थळी भेट देऊन आढाव घेतला. त्यानंतर उपाययोजना बाबत चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या मृत कोंबड्यांचा अहवाल येईपर्यंत या अज्ञात अजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी घटनास्थळ परीसरातील १० की.मी.चे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केले आहे. कुक्कुट पक्षी व ईतर पक्षी यांची खरेदी विक्री यावर बंधन घातले आहेत.तसेच येथे सर्वेक्षण करुन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी आश्रोबा भागवत यांच्या अचानक २५ कोंबड्या मरण पावल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.