परभणी जिल्ह्यात ५० टक्के सिंचनाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:18 AM2017-12-31T00:18:31+5:302017-12-31T00:18:47+5:30

पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून मिळालेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, आणखी ५० टक्के सिंचन होणे बाकी आहे़ कालव्याच्या दुरवस्थेमुळे १०० टक्के सिंचन होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत़

Lack of 50 percent irrigation in Parbhani district | परभणी जिल्ह्यात ५० टक्के सिंचनाला खो

परभणी जिल्ह्यात ५० टक्के सिंचनाला खो

googlenewsNext

प्रसाद आर्वीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून मिळालेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, आणखी ५० टक्के सिंचन होणे बाकी आहे़ कालव्याच्या दुरवस्थेमुळे १०० टक्के सिंचन होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत़
परभणी जिल्ह्यातील रबी हंगामासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेतले जाते़ दरवर्षी हे पाणी मिळणे अपेक्षित आहे़ मात्र मागील काही वर्षांपासून जायकवाडी प्रकल्पातच पाणी नसल्याने या प्रकल्पावरील सिंचन रखडले होते़ या वर्षी मुबलक पाऊस झाल्याने जायकवाडी प्रकल्प पाण्याने भरला असून, जायकवाडीचे पाणी परभणी जिल्ह्याला प्राप्त झाले आहे़ उपलब्ध पाण्यामधून जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली़ परभणी जिल्ह्यातून जाणाºया जायकवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून ९७ हजार ४०० हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येते़ त्या तुलनेत ४५ हजार हेक्टर सिंचन झाले आहे़ यावर्षी जिल्ह्याला ४ पाणी पाळ्या मंजूर झाल्या आहेत़ साधारणत: ३५ दिवसांची एक पाणी पाळी असते़ या काळात कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहचविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे ३० ते ३५ हजार एवढे सिंचन दरवर्षी होते़ यावर्षी सिंचनात वाढ झाल्याचेही अधिकाºयांनी सांगितले़ मात्र प्रत्यक्षात ९७ हजार ४०० हेक्टर जमीन सिंचन होणे अपेक्षित आहे़ परंतु, नादुरुस्त कालवे आणि पाण्याची वहन क्षमता कमी असल्याने सिंचनात अडथळे निर्माण होत आहेत़ (समाप्त)
पाणी क्षमतेचाही परिणाम
जायकवाडी डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ३६०० क्युसेस एवढी आहे़ मात्र या पूर्ण क्षमतेने कालव्यात कधीही पाणी सोडले जात नाही़ दोन वर्षांपूर्वी ८०० ते ९०० क्युसेसने पाणी मिळाले होते़ यावर्षी देखील पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला़ त्यानंतर १२०० ते १३०० क्युसेसने पाणी उपलब्ध झाले आहे़ त्यामुळे पाणी वहन क्षमताही जास्तीत जास्त सिंचनासाठी महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले़

Web Title: Lack of 50 percent irrigation in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.