बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:08 AM2021-05-04T04:08:32+5:302021-05-04T04:08:32+5:30
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी काळात सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. ...
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी काळात सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. याच दरम्यान, १ ते ४ एप्रिल या काळात किराणा दुकान व भाजीपाला दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे ४ दिवस ही बाजारपेठ खुली राहणार असल्याने नागिरकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळी ७ वाजेपासूनच भाजीपाला खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरातील कच्छी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ या परिसरातील किराणा दुकानांवरही मोठी गर्दी पाहावयास मिळाली. जिल्हाधिधकाऱ्यांच्या आदेशानुसार ४ एप्रिलपर्यंतच ही बाजारपेठ सुरू राहणार आहे. त्यामुळे सोमवारी नागरिकांनी बाजारपेठेत दाखल होऊन किराणा साहित्य व भाजीपाल्याची खरेदी केली. विशेष म्हणजे याच काळात परवानगी नसलेली काही दुकानेही सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. येथील अष्टभूजा देवी मंदिरापासून ते शिवाजी चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी रस्त्यांवर गर्दी होती.