तेलबिया उत्पादकता वाढविण्यास मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:46+5:302021-03-22T04:15:46+5:30

परभणी : मराठवाड्यात तेलबिया पीक लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादकता वाढविण्यासाठी मोठा वाव आहे. तेव्हा तेलबिया पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान ...

Large scope for increasing oilseed productivity | तेलबिया उत्पादकता वाढविण्यास मोठा वाव

तेलबिया उत्पादकता वाढविण्यास मोठा वाव

Next

परभणी : मराठवाड्यात तेलबिया पीक लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादकता वाढविण्यासाठी मोठा वाव आहे. तेव्हा तेलबिया पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये प्रसारित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पाच्यावतीने राष्ट्रीय तेलबिया उत्पादन अभियानांतर्गत १९ मार्च रोजी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण तर प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक दत्तप्रसाद वासकर, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक अरुण सोनोने यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना संचालक संशोधन डॉ. वासकर यांनी विद्यापीठ विकसित तेलबिया पिकांचे वाण, त्यासाठीचे यांत्रिकीकरण, करडई व कारळ पिकाचे औषधी मूल्य व बाजार व्यवस्था आदींविषयी माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करडई व कारळ पीक लागवड तंत्रज्ञान या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

करडई संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. बी. घुगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रतिम भुतडा यांनी सूत्रसंचालन केले. प्रशिक्षणास मराठवाड्यातील कृषी विज्ञान केंद्र, विद्यापीठांतर्गत विस्तार कृषी विद्या वेत्ता, महाबीज क्षेत्र अधिकारी व प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रात डॉ. एस. बी. घुगे, प्रा. प्रतिम भुतडा, डॉ. संतोष पवार, डाॅ. जाधव यांनी करडई व कारळ पिकाचे वाण, लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.

Web Title: Large scope for increasing oilseed productivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.