गंगाखेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे जखमी दोघांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 06:36 PM2017-12-15T18:36:18+5:302017-12-15T18:36:58+5:30
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना आज चार वाजेच्या सुमारास गंगाखेड परळी राज्य महामार्गावर निळा पाटीजवळ घडली. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गंगाखेड : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना आज चार वाजेच्या सुमारास गंगाखेड परळी राज्य महामार्गावर निळा पाटीजवळ घडली. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गंगाखेड येथून विष्णु भगवान पवार ( २५ वर्ष ), मोहन बालासाहेब हरकडे ( ३० वर्ष) व सर्जेराव गणपत राठोड हे तिघे दुचाकीवरून परळीकडे निघाले होते. निळा पाटीजवळ येताच त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात विष्णु,मोहन व सर्जेराव तिघेही जखमी झाले. याच दरम्यान परळी येथुन गंगाखेडकडे जाणारे बुरूड समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव ठेवरे व भारत तमखाने, अजित जैस्वाल यांना जखमी झालेले तिघेही नजरेस पडले. यानंतर त्यांनी तिन्ही जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ केशव मुंडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, परिचारिका निता देशमुख, राजेंद्र गायकवाड, प्रशांत राठोड यांनी जखमींवर तात्काळ प्रथमोपचार केले. जखमी मधील विष्णु पवार व मोहन हरकडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्या दोघांनाही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.