एक हजार ४०९ विद्यार्थ्यांची परीक्षेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:01+5:302021-03-22T04:16:01+5:30

परभणी शहरातील १४ परीक्षा केंद्रांवर २१ मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ...

Lessons of one thousand 409 students to the exam | एक हजार ४०९ विद्यार्थ्यांची परीक्षेकडे पाठ

एक हजार ४०९ विद्यार्थ्यांची परीक्षेकडे पाठ

Next

परभणी शहरातील १४ परीक्षा केंद्रांवर २१ मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी तीन हजार ९०७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. जिल्हा प्रशासनाने या सर्व विद्यार्थ्यांची शहरात आसन व्यवस्थाही केली होती. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास परीक्षेला प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मलगनच्या साह्याने तपासणी करून तसेच फिजिकल डिस्टन्स राखत परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक असल्याचे दिसून आले. एक हजार ४०९ परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. सकाळी १० ते २ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रात ही परीक्षा पार पडली. सकाळच्या सत्रामध्ये एक हजार ३९९, तर दुपारच्या सत्रामध्ये एक हजार ४०९ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. परीक्षा काळात केंद्र परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. त्याचप्रमाणे कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण जबाबदारी घेत प्रशासनाने ही परीक्षा घेतली.

Web Title: Lessons of one thousand 409 students to the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.