कोविडसाठी नियुक्त केले संपर्क अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:30+5:302021-03-23T04:18:30+5:30

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले असून, या अंतर्गत विविध अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती ...

Liaison Officer appointed for Kovid | कोविडसाठी नियुक्त केले संपर्क अधिकारी

कोविडसाठी नियुक्त केले संपर्क अधिकारी

Next

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले असून, या अंतर्गत विविध अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २२ मार्च रोजी हे आदेश काढले. मेडिकल ऑक्सिजन व्यवस्थापनाची जबाबदारी रोहयोचे उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्यावर देण्यात आली आहे. शासकीय, खासगी कोरोना केंद्रांमधील मेडिकल ऑक्सिजनच्या संदर्भात मागणी व पुरवठा याचा दैनंदिन आढावा घेऊन ऑक्सिजन साठा उपलब्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांच्याकडे व्यवस्थापन, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी बी. एच. बिबे यांच्याकडे जिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्याकडे आयटीआय हॉस्पिटल, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्याकडे वाॅर रूम व हॉस्पिटल व्यवस्थापन, डीआयओ सुनील पोटेकर यांच्याकडे हॉस्पिटल बेड व्यवस्थापन, नायब तहसीलदार रामदास कोलगणे यांच्याकडे आरटीपीसीआर तपासण्या, तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसीलदार अशोक मिरगे यांच्याकडे लसीकरण व्यवस्थापन, तर तहसीलदार संजय बिरादार यांच्याकडे खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देऊन त्यांची सनियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Web Title: Liaison Officer appointed for Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.