खोटे बोल; पण रेटून बोल ही भाजपाची प्रवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:35+5:302021-06-30T04:12:35+5:30
परभणी : खोटे बोल; पण रेटून बोल, ही भाजपाची प्रवृत्ती आहे, असा आरोप करीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण ...
परभणी : खोटे बोल; पण रेटून बोल, ही भाजपाची प्रवृत्ती आहे, असा आरोप करीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
येथील राजयोग मंगल कार्यालयात २९ जून रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अशोच चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, ज्यावेळी आम्ही विरोधात होतो, त्यावेळी आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी भाजपने मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासाठी का प्रयत्न केला नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुस्लीमबांधवांना आरक्षण द्यावे यासाठी देशात काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे; पण भाजपाने वेळोवेळी आरक्षणास स्पष्ट विरोध दर्शविला, असा आरोप चव्हाण यांनी केला. मराठवाड्याच्या विकासासाठी बुलेट ट्रेन व मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांतून जाणारा समृद्धी मार्ग आदीसाठी पाठपुरावा केला आहे. मेट्रोची पूर्तता झाल्यास परभणी- मुंबई हे अंतर तीन तासांत पूर्ण करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिंतुरातील दिग्गजांचा काँग्रेस प्रवेश
या कार्यक्रमात युवा नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे केशव अर्जुनराव बुधवंत, भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष गणेश काजळे, राजेंद्र नागरे, नगरसेवक टीकाखान पठाण, माजी नगरसेवक मुन्ना, सोहेल, अनिल घनसावंत, फेरोज मिस्त्री, सिराज मौलाना, मुफ्ती कलीम बेग मिर्झा, प्रकाशराव देशमुख चिमणगावकर, जगन्नाथ जाधव, माजी पं.स. सदस्य रामप्रसाद माघाडे, अर्जुन वजीर, कृष्णा राऊत दुधगावकर, रामेश्वर घुगे, पप्पू टाकरस, महेश सांगळे, जुबेर कादरी आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.