बसमधून जीवघेणा प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:17+5:302021-03-20T04:16:17+5:30

कार्यकारी अभियत्यांचे दुर्लक्ष परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कालव्याला जागोजागी तडे ...

The life-threatening journey by bus continues | बसमधून जीवघेणा प्रवास सुरूच

बसमधून जीवघेणा प्रवास सुरूच

Next

कार्यकारी अभियत्यांचे दुर्लक्ष

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कालव्याला जागोजागी तडे गेले आहेत, याशिवाय अनेक भागांत कालव्याच्या फरशा उखडल्या आहेत. ज्या उद्देशाने कालव्याची उभारणी झाली, त्या उद्देशालाच बगल दिली जात आहे. मात्र, याकडे कार्यकारी अभियंत्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

दोन-दोन महिने मिळेना जन्म प्रमाणपत्र

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मलेल्या बालकांचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात अर्ज भरून दिल्यानंतर दोन-दोन महिने हे प्रमाणपत्र मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सार्वजनिक सिंचन विहिरीच्या कामांकडे फिरविली पाठ

पुर्णा: तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक सिंचन विहिरीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, वेळेवर मजुरांना मजुरी व बांधकाम केलेले कुशल देयक मिळत नसल्याने, या कामाकडे ग्रामपंचायतींनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहणार आहे.

दुधना नदीचे पात्र झाले अरुंद

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील दुधना नदीपात्र परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. याशिवाय दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातही झाडेझुडपे वाढली आहेत.

शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण द्या

देवगावफाटा: शेतकऱ्यांवर सातत्याने संकटे येत असल्याने काहींकडून शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु त्यांना या संदर्भातील प्रशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागातील तरुणांना व शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.

ऊस रसविक्रीची दुकाने थाटली

खंडाळी : गंगाखेड शहर व परिसरात आतापासूनच उसाचा रस विक्री करण्याची दुकाने थाटण्यात येऊ लागली आहेत, शिवाय गल्लोगल्ली गाड्यावर रसविक्री करतानाही काही व्यावसायिक दिसून येत आहेत. खरेदीसाठी गर्दी होत आहे.

सेलू-वाकडी रस्त्यावर खड्डेच खड्डे

सेलू : सेलू ते वाकडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वीच हा रस्ता करण्यात आला होता. मात्र, वाळूच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते.

बस स्थानकात झुडपांचे साम्राज्य

पुर्णा : येथील बस स्थानकात पाठीमागील व समोरच्या भागात काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामध्ये डुकरे वावरताना दिसत आहेत, तसेच त्यामध्ये घाण, कचरा पडलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी येत आहे. झुडपे साफ करण्याची मागणी होत आहे.

रिडज ते भोगाव रस्ता दुरुस्तीची मागणी

भोगाव देवी : रिडज ते भोगाव देवी हा तीन किलोमीटर अंतर असलेला रस्ता अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असून, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ग्रामपंचायत, तसेच सा.बां. विभागाकडे ग्रामस्थांनी, तसेच वाहनचालकांनी वेळोवेळी तक्रार केली, परंतु अजूनही तक्रारीची दखल घेतली नाही.

मोकळ्या जागांचा अवैद्य कामासाठी वापर

सेलू : शहरातील मोकळ्या मैदानावर रात्री मद्यपींचा वावर वाढला असून, ही मैदाने नशेबाजांचे अड्डे बनत आहेत. विशेषतः खेळाच्या मैदानात दारूच्या बाटल्या, प्लास्टीकचे ग्लास, व स्नॅस्कची रिकामी पाकिटे इतरत्र पडलेले दिसून येत आहेत. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

वळण रस्ता धोकादायक

पालम : शहरात तलाव परिसरातून ताडकळसकडे जाणाऱ्या रस्त्यावर तलावाच्या कडेने कच्चा रस्ता मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. हा रस्ता धोकादायक ठरला आहे. दुचाकीचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यालगत तलावात पाण्याचा मोठा साठा उपलब्ध आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची दांडी

पालम: तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या उपकेंद्रावर कार्यरत कर्मचारी कामाला दांडी मारीत आहेत. कागदी घोडे नाचवत आरोग्य यंत्रणा गाफील राहत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कर्मचाऱ्यांचा गाफीलपणा नागरिकांना त्रासदायक होत आहे.

दारूची अवैध विक्री वाढली

बोरी: तालुक्यातील बोरी व परिसरात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने अवैध धंदेवाल्यांना मोकळे रान सुटले आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी बोरी, वस्सा, आसेगाव, दुधगाव गावातील ग्रामस्थांतून होत आहे.

रत्नापूर येथील क्रॉसिंग पॉइंट धोकादायक

मानवत: राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी-मानवत रस्त्यावरील पोखर्णी फाटा, रत्नापूर येथे क्रॉसिंग पॉइंट बनविण्यात आला आहे. या ठिकाणी दुभाजकही बसविण्यात आले असल्याने, रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूने येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे. क्रॉसिंग पॉइंट अपघात क्षेत्र बनत आहे.

Web Title: The life-threatening journey by bus continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.