विजेचा लपंडाव सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:40+5:302020-12-17T04:42:40+5:30
पुलावर खड्डे पालम- पालम ते जांभूळबेट रस्त्यावर शहरापासून जवळच असलेल्या गळाटी नदीपात्रात पुलावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. ...
पुलावर खड्डे
पालम- पालम ते जांभूळबेट रस्त्यावर शहरापासून जवळच असलेल्या गळाटी नदीपात्रात पुलावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची कसरत होत आहे. या रस्त्यावर जांभूळबेट, फळा येथे संत मोतीराम महाराज यांची समाधी आहे. खड्ड्यामुळे पुलावर वाहनातून उतरून पायी प्रवास करावा लागत आहे.
.
सरकारी कार्यालयात शुकशुकाट
पालम- येथील पंचायत समितीमधील बहुतांश अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांना ग्रामपंचायत निवडणूक कामासाठी तहसील कार्यालयात घेण्यात आले आहे. त्यामुळे पंचायत समिती परिसरात शुकशुकाट निर्माण झाला असून अनेक कामांचा खोळंबा होत आहे
.
साफसफाई केल्याने धुळीचे लोट
पालम- शहरात नवा मोंढा भागात नगरपंचायतकडून दररोज दुपारी २ वाजेच्या सुमारास दिवसाच्या साफसफाईची कामे केली जात आहेत. त्यामुळे दिवसभर धुळीचे लोट निर्माण होऊन दुकानात धूळ साचत आहे. मोंढ्यात वर्दळ सुरू असताना ही कामे केली जात आहेत.
दिशादर्शक फलक लावण्याची गरज
पालम- शहरातून परभणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तलावानजीकच्या परिसरात गावांची नावे दर्शविणारा दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. या ठिकाणी फलक नसल्याने नवीन आलेले प्रवासे वाहने सरळ रस्त्याने जांभूळ बेटाकडे जात आहेत.