सदस्यांना खर्च रकमेची मर्यादा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:43+5:302021-01-02T04:14:43+5:30
उमेदवारांची केली कोरोना चाचणी. देवगाव फाटा: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या सूचनेप्रमाणे सेलू तहसील कार्यालयात तालुका ...
उमेदवारांची केली कोरोना चाचणी.
देवगाव फाटा: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या सूचनेप्रमाणे सेलू तहसील कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांच्या पथकाने १ हजार ११६ उमेदवारांचे आरटीपीसीआर स्वॅब चाचणी घेतली असून दोन ते तीन दिवसात हे अहवाल येतील असे सांगण्यात आले.
बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मदतदारांशी संपर्क सुरू..!
देवगाव फाटा: ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे एका - एका मताचे गणित जुळवले जाते. कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांना संपर्क करणे सुरू झाले असून मागील सहा महिन्यापूर्वी कोरोनामुळे बाहेरगावाहून आलेल्या गावातील नागरिकांना गावबंदी केली होती. गावबंदी करणारी मंडळी आता बाहेरगावच्या मतदारांना गावी कशा पद्धतीने आणतात हा विषय चर्चिला जात आहे.
विद्युत देयके माफ करण्याची मागणी.
देवगाव फाटा : महावितरणकडून लाॅकडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा वीज बिल देण्यात आली होती. या देयकाची रक्कम ही मोठी असल्याने सामान्य वीजग्राहक ही वीज बील भरू शकत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक बील रक्कम माफ करावी अशी मागणी करीत आहेत.
फळ पिकवण्यासाठी रसायनचा वापर.
देवगाव फाटा: बाजारपेठेतील कच्ची फळे आयात केल्यानंतर ती पिकविण्यासाठी कारपेट व विविध रसायनांचा वापर करून लवकर फळे विक्री करता येतील या उद्देशाने ही फळे पिकवली जातात. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. या प्रकाराची दक्षता घेणे आवश्यक आहे
ग्रामीण भागात वीजबिल वाटपात सुसूत्रता आणावी
देवगाव फाटा: सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरणच्या वतीने ग्राहकांना दरमहा वीज बिले वाटप होत नाहीत. शिवाय दरमहा रिडींग घेतली जात नसल्याने ॲव्हरेज बिल आकारणी होत असल्याने ग्रामीण भागात वीज देयकाच्याबाबतीत सुसूत्रता आणणे गरजेचे आहे.
अरूंद पूल बनला अपघाताचे केंद्र
देवगाव फाटा : देवगाव फाटा - जिंतूर रस्त्यावर देवगाव फाटा येथे करपरा नदीवरील निजामकालीन पूल हा अरूंद असून या पुलाच्या भिंतीला तडे गेल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. वळण रस्ता असल्याने या पुलाचा चालकांना नेमका अंदाज येत नाही एकंदरीत हा पूल अपघाताचे केंद्र बिंदू बनला आहे.
कर्मचाऱ्यांचे रात्री जागरण
देवगाव फाटा: ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान निवडणूक निर्वाचन अधिकारी यांना सकाळी साहित्य देणे व सायंकाळी ५ वा.परत घेणे व त्यानंतर माहिती संकलन करणेसाठी कर्मचाऱ्यांना रात्री १२ ते २ वा.पर्यंत जागरण करावे लागत आहे.