राहतात परभणीत, लायसन्स काढले परदेशाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:13 AM2021-07-10T04:13:32+5:302021-07-10T04:13:32+5:30

मुदत एका वर्षाचीच आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी परदेशात जाण्यापूर्वी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल ...

Lives in Parbhani, licensed abroad | राहतात परभणीत, लायसन्स काढले परदेशाचे

राहतात परभणीत, लायसन्स काढले परदेशाचे

googlenewsNext

मुदत एका वर्षाचीच

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी परदेशात जाण्यापूर्वी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येतो. यासाठी सध्याचा वाहन परवाना, पासपोर्ट, आधार कार्ड, व्हॅलिड व्हिजा या कागदपत्रांची आवश्यकता असते. परदेशातील दुचाकी व चारचाकी हे लायसन्स दिले जाते. यासाठी एक हजार रुपये शुल्क असून, ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज केल्यानंतर एका दिवसात सदरील लायसन अर्जदाराला दिले जाते.

परदेशात जाणाऱ्या नागरिकांनी कागदपत्र घेऊन अर्ज केल्यानंतर त्यांना एका दिवसाच्या आत ऑफलाइन किंवा ऑनलाइन अशा पद्धतीने कार्यालयात हजर राहून लायसन्स देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यामुळे नागरिकांना परदेशात गेल्यावर तेथील वाहन चालविण्याचा परवाना काढण्याची गरज नाही. - श्रीकृष्ण नकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी.

मागील वर्षी २०१९-२० मध्ये केवळ दोन जणांनी लायसन्स काढले, तर २०२०-२१ मध्ये आतापर्यंत केवळ एका जणाचा अर्ज आला आहे.

तुम्हालाही काढायचे इंटरनॅशनल लायसन्स

परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये भारताने दिलेले हे लायसन्स यादी प्राप्त असलेल्या एकूण १४६ देशांमध्ये चालू शकते. त्या-त्या देशातील यादीनुसार हे लायसन्स, पासपोर्ट, व्हिजा बघून काढले जाते. एक वर्षानंतर नव्याने लायसन काढायचे असल्यास प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यावरही पुन्हा मुदत वाढवून दिली जाते.

Web Title: Lives in Parbhani, licensed abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.