परभणीत दुष्काळी पाहणी पथकासमोर स्थानिक अधिकाऱ्यांची भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:14 AM2018-12-06T11:14:28+5:302018-12-06T11:16:10+5:30
पथकाने आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील गणेशपूर परिसरात कापसाच्या शेत पिकाची पाहणी केली.
परभणी : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाने सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील गणेशपूर परिसरात कापसाच्या शेत पिकाची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी पथकाने संवाद साधला.
या दरम्यान, दुष्काळी उपाययोजना बाबत झालेल्या चर्चेत महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उत्तरे देताना भंबेरी उडाली. मनरेगाची कामे उपलब्ध करून देणे, दूरच जॉब कार्डच पुरेसे दिले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शेत जमिनीचे हेल्थ कार्ड ही शेतकऱ्यांना दिले नसल्याचेही यावेळी समोर आले. स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये यावेळी माहितीबाबत समन्वय आढळून आला नाही. पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.