Lok Sabha Election 2019 : परभणीत राष्ट्रवादीच्या विजयात इतर पक्षांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:53 PM2019-04-05T13:53:09+5:302019-04-05T13:56:39+5:30

परभणी लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या विजयात इतर पक्षांचा अडसर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ हे इतर पक्षच शिवसेनेच्या पथ्यावर पडत आहेत़ 

Lok Sabha Election 2019 : other parties candidates are the barriers to NCP's victory in Parbhani | Lok Sabha Election 2019 : परभणीत राष्ट्रवादीच्या विजयात इतर पक्षांचा अडसर

Lok Sabha Election 2019 : परभणीत राष्ट्रवादीच्या विजयात इतर पक्षांचा अडसर

googlenewsNext

- अभिमन्यू कांबळे, परभणी

परभणी लोकसभा मतदारसंघाच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड़ गणेशराव दुधगावकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांचा ६५ हजार ४१८ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार राजश्री जामगे यांना ६४ हजार ६११ मते मिळाली होती़ म्हणजेच दुधगावकर यांच्या विजयी आघाडीपेक्षा फक्त ८०७ कमी मते बसपाने उमेदवाराने मिळविली होती़ तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार बबन मुळे यांनी ११ हजार ८६१ मते मिळविली होती़ लोकविकास पार्टीचे उमेदवार सय्यद इक्रामोद्दीन यांनी ९ हजार १९८,  भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार गंगाधर भांड यांनी ८ हजार ६७७ तर स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार मानवेंद्र काचोळे यांनी ८ हजार ४९६ मते मिळविली होती़ याशिवाय ७ अपक्ष उमेदवारांनी ५७ हजार ८३८ मते मिळवीत राष्ट्रवादीला विजयापासून दूर ठेवले होते़ 

2014 च्या  लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचा शिवसेनेने १ लाख २७ हजार १५५ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना ५ लाख ७८ हजार ४५५, तर राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांना ४ लाख ५१ हजार ३०० मते मिळाली होती़ याशिवाय या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार गुलमीर खान यांना ३३ हजार ७१६ तर सीपीआयचे उमेदवार कॉ़ राजन क्षीरसागर यांना १२ हजार ४०४ आणि समाज पार्टीचे उमेदवार अ‍ॅड़ अजय करंडे पाटील यांना ५ हजार ५०७ मते मिळाली होती़ भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार बबन मुळे यांना  हजार १५४ मते मिळाली होती़ आम आदमी पार्टीच्या उमेदवार सलमा कुलकर्णी यांना ४ हजार ४४९ मते मिळाली होती़ तसेच मजलीस बचओ तहेरिकचे उमेदवार शेख सलीम यांना २ हजार ९४७ तर वेल्फेअर पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार सय्यद अब्दुल यांना २ हजार ४९२ आणि आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अशोक अंभोरे यांना १ हजार ८८९ मते मिळाली होती़ 

११ पक्षांना मिळालेली मते 1,00,000
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या ११ पक्षांनी १ लाख ७ हजार ६९ मते मिळविली होती, तर ६ अपक्ष  उमेदवारांनी ३७ हजार ७५० मते मिळवित राष्ट्रवादीच्या विजयात अडसर निर्माण केला होता़ या निवडणुकीत राष्ट्रवादीचा शिवसेनेने १ लाख २७ हजार १५५ मतांनी पराभव केला होता़

Web Title: Lok Sabha Election 2019 : other parties candidates are the barriers to NCP's victory in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.