‘लोकमत बालविकास मंच’तर्फे आज आंतर शालेय गाण्यांच्या स्पर्धा आयोजित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:19 AM2021-09-18T04:19:46+5:302021-09-18T04:19:46+5:30
या कार्यक्रमाचे आयोजन अद्वैता स्कूल ऑफ एक्सिलंस, परभणी यांच्याकडून करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दोन गट आहेत. पहिला गट- ...
या कार्यक्रमाचे आयोजन अद्वैता स्कूल ऑफ एक्सिलंस, परभणी यांच्याकडून करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात दोन गट आहेत. पहिला गट- पाचवी ते सातवी (वेळ सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ) आणि दुसरा गट आठवी ते दहावी.( दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ) या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बॉलीवूड साँग (मराठी, हिंदी) गाणे गायचे आहे. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला येताना आपण जे गाणे गाणार आहात त्या गाण्याचा कराओके ट्रॅक (साँग) पेनड्राईव्ह किंवा मोबाईलमध्ये सोबत आणायचा आहे.
या कार्यक्रमात शाळेकडून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा. दोन गटामध्ये एका शाळेचे फक्त एक-एक विद्यार्थी सहभाग घेवू शकतात. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला अर्धा तास वेळेअगोदर यायचे आहे. कार्यक्रमात परीक्षकाचा निर्णय अंतिम असणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वरछंद प्रतिष्ठान गायन वादन विद्यालयाचे लक्ष्मीकांत रवंदे हे कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत. कार्यक्रमात दोन्ही गटामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय निवडले जाणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना ट्रॉपी आणि सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क- लोकमत कार्यालय, परभणी. मो- ९२८४३०७३५३.