स्वस्त सोन्याचे आमिष महागात पडले; मुंबईच्या महिलेस सेलूत बोलावून ८ लाखाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:02 PM2020-12-26T17:02:36+5:302020-12-26T17:04:23+5:30

Crime News सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावरील एका शेतात नेऊन मारहाण करत लुटले

The lure of cheap gold became expensive; 8 lakh looted from Mumbai | स्वस्त सोन्याचे आमिष महागात पडले; मुंबईच्या महिलेस सेलूत बोलावून ८ लाखाला लुटले

स्वस्त सोन्याचे आमिष महागात पडले; मुंबईच्या महिलेस सेलूत बोलावून ८ लाखाला लुटले

Next
ठळक मुद्देकमी भावात सोने देतो म्हणून मुंबई येथील महिलेची फसवणूकखात्री पटावी म्हणून पहिल्या वेळेस खरे सोने देत व्यवहार पूर्ण केला

सेलू :  कमी भावात सोने देतो म्हणून मुंबई येथील एका डाॅक्टर महिलेला सेलू येथे बोलावून मारहाण करून ८ लाख रुपये लुटल्याची घटना  डिग्रस बरसाले शिवारात उघडकीस आली आहे. शुक्रवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून सेलू पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई येथे डॉ. उज्वला संदीप बोराडे यांचा मालाड येथे दवाखाना आहे. त्यांच्याकडे सुनिता ( पूर्ण नाव माहित नाही) ही महिला पेंशन्ट म्हणून अडीच वर्षापासून येत होती. १ महिन्यांपूर्वी डॉ. उज्वला यांना सुनिताने  फोन करून आम्हाला गावाकडील शेतात १ किलो सोने सापडले आहे. तुम्हाला ३० हजार रुपये तोळा प्रमाणे देतो असे सांगितले. त्यानंतर डॉ. उज्वला या पती,  काका यांना घेऊन वाहनाने सोने खरेदी करण्यासाठी सेलू येथे शुक्रवारी आल्या. त्यांना सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावरील एका शेतात सोनेचा व्यवहार करण्यासाठी नेले. येथे सुनिता आणि तिच्या सात साथीदारांनी डॉ. उज्वला आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. व्यवहारासाठी आणलेले ८ लाख रुपये रोख आणि मोबाईल फोन घेऊन ते सर्वजण फरार झाले. याप्रकरणी सेलू पोलिसात डॉ. उज्वला संदीप बोराडे यांच्या फिर्यादीवरून सुनीतासह अज्ञात ७ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर करत आहेत.

यापूर्वी झाला होता सोन्याचा व्यवहार 
सुनिता हीने यापूर्वी डॉ. उज्वला यांना सेलू येथे बोलावून ३० हजार रुपयात दोन सोन्याचे गिण्णी व अंगठी दिले होते.  त्यांनी मुंबईत सोने खरे आहे की खोटे याची पडताळणी केली असता दिलेले सोने खरे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पुढील व्यवहारासाठी त्यांनी ८ लाख रुपये  आणले. मात्र आरोपींनी डाव साधत मारहाण करत रक्कम लुटली. दरम्यान, कमी भावात सोने घेण्याची हव्यास त्यांना महागात पडला.

Web Title: The lure of cheap gold became expensive; 8 lakh looted from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.