Maharashtra Bandh : परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीने रॅली काढून लखीमपूर घटनेचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 01:44 PM2021-10-11T13:44:16+5:302021-10-11T13:46:56+5:30

Maharashtra Bandh : शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सोमवारी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली.

Maharashtra Bandh : Parbhani Bandha mixed response; Mahavikas Aghadi staged a rally to protest the Lakhimpur incident | Maharashtra Bandh : परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीने रॅली काढून लखीमपूर घटनेचा केला निषेध

Maharashtra Bandh : परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीने रॅली काढून लखीमपूर घटनेचा केला निषेध

googlenewsNext

परभणी : उत्तर प्रदेशातील लखिमपूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला ( Maharashtra Bandh ) जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. 

सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून महाविकास आघाडीतर्फे रॅली काढण्यात आली. उत्तर प्रदेशातील लाखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून परभणी जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सोमवारी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली. येथील शिवाजी चौकात निषेध सभा घेऊन केंद्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. 

यावेळी खा. बंडू जाधव, खा. फौजिया खान, आ. सुरेश वरपूडकर, आ. डॉ. राहुल पाटील, विशाल कदम, माजी खा. तुकाराम रेंगे, बाळासाहेब देशमुख, उपमहापौर भगवान वाघमारे, सभापती गुलमीर खान, रवी सोनकांबळे, नदीम इनामदार आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर शिवाजी चौकपासून ते गांधी पार्कपर्यंत रॅली तसेच शिवाजी चौक ते जनता मार्केट आणि शिवाजी चौक ते सुभाष रोड या मार्गावर रॅली काढण्यात आली.

Web Title: Maharashtra Bandh : Parbhani Bandha mixed response; Mahavikas Aghadi staged a rally to protest the Lakhimpur incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.