Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात २८ उमेदवारांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 05:47 PM2019-10-07T17:47:39+5:302019-10-07T18:02:14+5:30
५३ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
परभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून, ५३ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
जिंतूर विधानसभा मतदार संघातून १७ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून, १३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. परभणी मतदार संघातील २७ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली असून, १५ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील २३ पैकी ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. पाथरी विधानसभा मतदार संघातील १४ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून, १० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. जिल्ह्यातील चारही मतदार संघात एकूण ८१ पैकी ५३ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत.