शेती नुकसानाचे तातडीने पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:21+5:302021-09-09T04:23:21+5:30
मानवत : तालुक्यात ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
मानवत : तालुक्यात ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने बुधवार, ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्याकडे करण्यात आली.
हातातोंडाशी पीक आलेले असताना पावसाने ७ सप्टेंबर रोजी धुमाकूळ घातल्याने तालुक्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, हे नुकसान न भरून येणारे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने ८ सप्टेंबर रोजी केली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोविंद घाडगे, अनुरथ काळे, माधव शिंदे, राजेभाऊ होगे, कृष्णा शिंदे, सुरज काकडे, अमीर अन्सारी, गोपाळ पिंपळे, रामेश्वर पिंपळे, रामप्रसाद काळे, माधव भिसे, माऊली चांगले, माऊली शिंदे, आकाश गोंडगे, बाबा शेख, मुंकीद शिंदे, नितीन शिंदे यांच्या सह्या आहेत.