पैशाच्या देवाण-घेवाणवरुन एकाचा चोकू भोसकून खून; परभणीतील घटना, दोघांवर गुन्हा

By राजन मगरुळकर | Published: July 31, 2022 05:32 PM2022-07-31T17:32:19+5:302022-07-31T17:32:25+5:30

पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात घडली आहे.

man Murdered by stabbing in money dispute in Parbhani, crime against two accused | पैशाच्या देवाण-घेवाणवरुन एकाचा चोकू भोसकून खून; परभणीतील घटना, दोघांवर गुन्हा

पैशाच्या देवाण-घेवाणवरुन एकाचा चोकू भोसकून खून; परभणीतील घटना, दोघांवर गुन्हा

Next

परभणी : पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरातील एका हॉटेलसमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नानलपेठ ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफिक शेख चांद शेख उर्फ बाबा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. खंडोबा बाजार परिसरातील मराठवाडा शाळेसमोर शनिवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

रफिक शेख चांद शेख हे या परिसरात मित्रासोबत उभे होते. त्यावेळी आरोपी फिरोज खान अब्दुल खान आणि शेख शाहरुख शेख रशीद (एसआरके) हे दोघे तेथे आले. रफिक शेख चांद शेख याच्यासोबत पैशाच्या देवाण-घेवाण कारणावरून झालेल्या वादात फिरोज खान अब्दुल खान याने रफिक शेख चांद शेख याच्या पोटात चाकू मारला. तसेच शेख शाहरुख शेख रशीद याने रफिक शेख चांद शेख यास गंभीर जखमी केले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या रफिक शेख चांद शेख यास त्यांच्या मित्राने व नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालय व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, यामध्ये रफिक शेख चांद शेख याचा मृत्यू झाला.

एकास घेतले ताब्यात
घटनेनंतर नानलपेठ पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले.  सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस निरीक्षक समाधान चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्यासह पोलीस पथकाने पंचनामा केला. याप्रकरणी नानलपेठ ठाण्यात रहीम खान शरदल खान पठाण (रा.अमीन कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. फिरोज खान अब्दुल खान या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा आरोपी शेख शाहरुख शेख रशीद (एसआरके) हा फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस पथक करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी तपास करीत आहेत.

Web Title: man Murdered by stabbing in money dispute in Parbhani, crime against two accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.