खात्यातील पैसे सांभाळा, ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:20 AM2021-09-22T04:20:54+5:302021-09-22T04:20:54+5:30
जिल्ह्यात कोरोना लाँकडाऊन तसेच त्यानंतरच्या कालावधीत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मोबाईलमध्ये कोणतीही शहानिशा न करता एखादे अनोळखी अँप ...
जिल्ह्यात कोरोना लाँकडाऊन तसेच त्यानंतरच्या कालावधीत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मोबाईलमध्ये कोणतीही शहानिशा न करता एखादे अनोळखी अँप घेत्यानंतर आपल्या खात्यातील रक्कम काढून घेण्याचे प्रकारही घडले आहेत. याशिवाय स्वत: ओटीपी सांगून मग फसवणूक झाल्याचे प्रकारही अनेकांच्या बाबत घडले आहेत. मात्र, तक्रारदार सायबर विभागाकडे येत नसल्याने पोलीस स्टेशन अंतर्गत यातील काही ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, त्याची संख्या बोटाबर मोजण्याइतकी आहे.
या बाबी टाळा
- कोणीही ओटीपी विचारल्यास देऊ नये
- एटीएम कार्ड तसेच क्रेडिट कार्ड कुठेही स्वाईप करताना क्लोन होणार नाही, याची काळजी घ्यावी
- अनोळखी वेबसाईटला भेट देणे टाळावे
- कार्ड बंद झाले किंवा ब्लॉक झाले असे सांगून ओटीपी मागणाऱ्यांना तो देऊ नये
या बाबींचा धोका
- कोणतीही अप्लिकेशन मोबाईलमध्ये घेताना थर्ड पार्टी अँलो करू नये
- प्ले स्टोअरमधून अँडवेअर, मालवेअर ॲप तपासून त्याची रेटिंग व रिव्ह्यू पाहून मगच मोबाईलमध्ये घ्यावे
सर्वच प्रकरणात होते आरोपपत्र दाखल
ऑनलाइन फसवणूक असो की अन्य कोणतेही तक्रार यामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपपत्र सर्व प्रकरणात दाखल होते. त्यानुसार त्याचा तपासही केला जातो.
तक्रार येते पोलीस ठाण्यात
ऑनलाईन फसवणुकीचे झालेले प्रकार थेट सायबरकडे वर्ग होत नाहीत. याबाबत तक्रारदाराची पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर सदरील गुन्हा सायबर विभागाशी संबंधित असल्यास पोलीस ठाण्याकडून तो वर्ग केला जातो. असे प्रकार घडले असले तरी त्याची नोंद पोलीस ठाण्यात होते.